
Eknath Shinde । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मनी लॉंडरिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर करण्यात आला होता. यामधीलच एका प्रकरणात आता भावना गवळी यांना ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Jitendra Awhad । “जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला पुरस्कार देणार”- हिंदू महासभेची मोठी घोषणा
भावना गवळी या वाशिम-यवतमाळ शिवसेना शिंदे गटाच्या खासदार आहेत. भावना गवळी यांना आर्थिक व्यवहाराप्रकरणी २९ डिसेंबर रोजी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांना ५ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास देखील सांगितले आहे. त्यामुळे आता भावना गवळी यांना ५ जानेवारीपर्यंत आयकर विभागाला उत्तर सादर करावे लागणार आहे.
माहितीनुसार, १८ कोटी १८ लाख ४० हजार ४६७ रुपयांच्या गैरवव्यवहार आणि सात कोटी रुपयांच्या चोरीबाबत १२ मे २०२० रोजी रिसोड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या बाबत तक्रार दाखल झाली होती. आता या आर्थिक व्यवहारात संदर्भात त्यांना आयकर विभागांमध्ये विवरण सादर करावे लागणार आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान मधील मनी लॉन्ड्री प्रकरणी त्यांना ईडी कडून याआधी देखील नोटीस बजावण्यात आली होती.
Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट!