Accident News । एका क्षणात सर्व उध्वस्त! भीषण कार अपघातात आईसह मुलाचा मृत्यू

Accident News

Accident News । सध्या दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. या अपघातामुळे अनेकांची संसार उध्वस्त होतात तर काहींना जन्माचे अपंगपण येते. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Nagapur Accident)

Deepika Padukone Birthday । लग्नानंतरही दीपिका पदुकोण बोल्ड आणि इंटिमेट सीन्स देण्यास मागेपुढे पाहत नाही

नागपूरहून अमरावतीकडे भरधाव कार नियंत्रण सुटून पलटी होत दुभाजकाला धडकली आणि हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

Cabinet Meeting । नवीन वर्षाचं शिंदे सरकारने दिलं मोठं गिफ्ट; घेतला मोठा निर्णय

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कार नागपूरवरून अमरावतीकडे जात होती यावेळी कारचा वेग जोरात होता त्यामुळे कार पलटली आणि दुभाजकाला धडकली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्यास सुरुवात केली.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का! कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी पक्षातील खासदाराला इन्कम टॅक्सची नोटीस

Spread the love