
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार शिंदे सरकार करत आहे. लवकरच याबाबत निर्णय देखील घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांच्या मेंदूला जास्त ताण देऊ नये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजेल असे शिकवावे त्यामुळे त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. हे माझ व्यक्तिगत मत आहे. पण याबाबत तज्ज्ञांशी बोलून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयामागचा हेतू म्हणजे, मुलांना खेळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा जेणेकरून त्यांच्या कलागुणांना देखील वाव मिळेल. या वर्षांमध्ये हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुलांच्या पाठीवरील ओझं कमी होणार आहे.
आता ‘या’ रेशनकार्ड धारकांवर केंद्र सरकार करणार कारवाई, वाचा नवीन नियम
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेणे हे पालकांसाठी खूप जिकरीचे असते. अशावेळी गृहपाठ बंद झाल्यावर पालकांचा देखील ताण कमी होऊ शकतो असे म्हंटले जात आहे. पण आता विद्यार्थ्यांना गृहपाठ नसेल तर विद्यार्थी घरी देखील अभ्यास करणार नाहीत. त्यामुळे या निर्णयाला विरोध देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे पालक आणि तज्ञांकडून काय प्रतिक्रिया येतात आता महत्वाचे ठरणार आहे.
Mouni Roy: हाय गर्मी! मौनी रॉयचा लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; पाहा PHOTO