Jalgaon Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावमधील पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा या ठिकाणी भरधाव कारणे चार ते पाच जणांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीसह वृद्ध जागीच ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे.
Aditya Thackeray । बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का
या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
Ajit Pawar । ‘माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे’ – अजित पवार
शाळेतून मुले घरी येत असताना त्याचबरोबर शेतातून शेतकरी शेतमजूर घरी येत असताना पाचोर्याकडून लाल कलरची स्विफ्ट ही गाडी भरधाव वेगाने जळगावकडे चालली होती. यावेळी कारणे चौघांना उडवले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे तेथील गावावर मोठी शोककळा पसरले आहे. (Jalgaon Accident News)
Accident News । एका क्षणात सर्व उध्वस्त! भीषण कार अपघातात आईसह मुलाचा मृत्यू