मुंबई : राज्यात शिंदे आणि फडवणीस सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. तरीसुद्धा अजूनदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दोन्ही नेते ज्येष्ठ आणि वरिष्ठांच्या भेटी घेतात. मंत्रिमंडळात कोणाला किती जागा भेटणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी फडवणीस आणि शिंदे अनेक वेळा दिल्लीला जाऊन आले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अजूनही स्पष्ट झाले नाही.
माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या विस्तारा बाबत काही स्पष्ट नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendr Fadanvis) यांनी एक ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत आरएसएसच्या कार्यालयात भेट घेतली , शिंदे व फडणीस यांना भागवत यांनी पुस्तक भेट दिलं. यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असं सांगण्यात आल आहे.
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets RSS chief Mohan Bhagwat at the RSS office in Mumbai. pic.twitter.com/CBCU5QpqWG
— ANI (@ANI) August 1, 2022
या भेटीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहन भागवतांची पहिली भेट. या आदी मी त्यांना अनेकदा भेटलो आमचे सरकार हिंदुत्व या समान विचारधारेला घेऊन स्थापन झालेले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत”.