Sharad Mohol । काल पुणे या ठिकाणी शरद मोहळ या आरोपीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये शरद मोहळ (Sharad Mohol ) गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. (Sharad Mohol Case Update News)
पोलिसांनी या आरोपीला शिरवळमधून अटक केली आहे. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर पळून जाण्याच्या मार्गावर होता मात्र पोलसांनी त्याचा पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ३ पिस्टल देखील जप्त केले आहेत. ज्या पिस्टल मधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता ते पिस्टल देखील पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबरोबर हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांनी केला सर्वात मोठा खळबळजनक दावा!
प्राथमिक माहितीनुसार, यातील आरोपींचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी शरद मोहळ याला मारले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद मोहळ याची हत्या झाली की लगेच कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता. यानंतर गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी पोलिसांना आरोपाला पकडण्यात मोठे यश आले आहे.