Sharad Mohol Murder । काल पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली असून यामुळे पुण्यात सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आता याप्रकरणी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात दोन नामांकित वकिलांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Sharad Mohol Murder)
Dhangar Reservation । धक्कादायक! धनगर आरक्षणासाठी युवकाचा टोकाचा निर्णय, संपवलं जीवन
पुणे शाखेच्या पथकाने दोन्ही वकिलांना अटक केली. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. मोहोळ खून प्रकरणातील दोन्ही आरोपी वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे आरोपी वकील पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी या आरोपी वकिलांची नावे आहेत. पुणे शाखेने या दोन्ही आरोपींना रात्री अटक केली आहे.
Ajit Pawar । शरद मोहोळ हत्या प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान या प्रकरणांमध्ये दोन वकिलांचा काय सहभाग होता? या प्रकरणात आणखी मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे का? शरद मोहोळ याच्या हत्येचे नेमके कारण काय? या सर्व गोष्टींचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे. या खुनाचा तपास करणे पोलीस यंत्रणा समोर मोठे आव्हान आहे.
Anganvadi Strike। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावर तोडगा निघेना, नऊ हजार कर्मचाऱ्यांनी पुकारला संप