Ajit Pawar । ठाणे : अनेक दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरु आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने (Maratha Reservation Strike) घेतली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. आरक्षणावरून राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest marathi news)
Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने केला ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
आरक्षण (Reservation) प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार करीत असून इतर आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सध्या ६२ टक्के आरक्षण असून यात ओबीसी, एस. टी. एस. सी. सह ५२ टक्के आरक्षण तर १० टक्के आरक्षण हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार देश चालत आहे, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्याचा मुलायजमा ठेवला जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पवारांनी दिला. (Manoj Jarange Patil vs Ajit Pawar)
Ajit Pawar On Manoj Jarange । ब्रेकिंग! अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिला सर्वात मोठा इशारा!
काही जण टोकाची भूमिका घेत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करीत आहेत. कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असेही अजित पवार म्हणाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा कल्याण – मुरबाड रोडवरील वरप या गावी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
Supriya Sule । शरद मोहळच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप!