शेतकऱ्यांना शेतीतून सर्व प्रकारे फायदा व्हावं म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान अशातच आता शासनाच्या (government) माध्यमातून सिंचनासाठी विविध योजनांद्वारे अनुदान दिले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना (farmers) शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन (micro irrigation) जास्त फायद्याचं ठरतं. कारण या सूक्ष्म सिंचनामुळे पाणी जास्त वाया जात नाही.
दातांचा पिवळेपणा दूर करायचाय? करा ‘हे’ घरगुती उपाय
यामुळे शासनाने सिंचनासाठी वेगवेगळ्या योजना (scheme) राबवत अनुदान दिले आहे. म्हणून शेतकऱ्यांना (Agriculture) शेती करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक (Financial) दिलासा मिळत आहे. याच संदर्भात शेतकऱ्यांसाठी शासनाने एक नवीन योजना आणली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना.
जनावरांना ‘हे’ तीन प्रकारचे गवत द्या, दूध वाढीसाठी होईल मदत
राष्ट्रीय कृषी विकास योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजना सूक्ष्म सिंचनाकरता 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 666 कोटी 67 लाख रुपये अनुदानाच्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान त्याचवेळी यंदा 1 लाख 88 हजार हेक्टर एवढे क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली येण्याची अपेक्षा असल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ.कैलास मोते यांनी दिली.
Narendra Modi: मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष ऑफर, ’56 इंची थाळी खणाऱ्याला मिळणार 8.5 लखांच बक्षीस
किती शेतकऱ्यांनी केले अर्ज?
सूक्ष्म सिंचनासाठी आतापर्यंत राज्यातील 4 लाख 4 हजार 614 शेतकर्यांनी अर्ज केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांपैकी 2 लाख 82 हजार 515 शेतकर्यांची निवड झालीय. दरम्यान निवडलेल्या शेतकऱ्यांपैकी 84 हजार 329 शेतकर्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्याकरता पूर्वसंमती देण्यात आलीय.