Viral Video । सोशल मीडियावर तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मित्र एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चोरीचा आरोप केला. सर्वप्रथम तो संभाषणातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण नंतर एक मित्र दुसऱ्या मित्राला कानाखाली मारतो. कानाखाली मारल्यानंतर दुसरा मित्रही तापतो आणि तो दुसऱ्या मित्रालाही कानाखाली मारतो.
Pune News । पुण्यात ऑनड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलं भयानक; मेंदूत रक्तस्त्राव होऊन…
काही वेळातच दोघे मांजर आणि उंदीर सारखे आपसात भांडू लागतात. यानंतर त्यांच्यात चांगली तुफान हाणामारी झाल्याचे देखील दिसत आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांना शिवीगाळ करतानाही ऐकायला मिळतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
Kalesh inside hostel room b/w Two Bois over Black t-shirt caught other guy while stealing wallet
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 10, 2024
pic.twitter.com/ts2FhJFuiY
व्हायरल होत असलेल्या या मित्रांच्या भांडणाच्या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ‘जे मुलं एन्जॉय करत आहेत तेच तुमचे खरे शत्रू आहेत, त्यांच्यापासून दूर राहा’ अशी कमेंट एका यूजरने केली आहे. दुसर्या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सिनियर चपरी vs ज्युनियर चपरी.’ अशा वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.