Accident News । सध्या अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघातामुळे अनेक कुटुंब देखील उध्वस्त झाली आहेत. सध्या देखील हिंगोलीमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये देखील एक कुटुंब उध्वस्त झाले आहे. आई-वडिलांना दुचाकीवरून दवाखान्यात घेऊन जाताना मुलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये मुलगा आई-वडील असा तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Accident News Hingoli)
माहितीनुसार, हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील तिघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री आई-वडिलांची तब्येत बिघडल्याने मुलगा त्यांना दवाखान्यात घेऊन जात होता. मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. रात्रीच्या वेळी अपघाताची घटना उघडकीस आली नाही. सकाळी अपघाताची घटना समोर आली आहे.
Sharad Mohol । ब्रेकिंग! गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी २ आरोपींना अटक; धक्कादायक माहिती समोर
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये मुलासह आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी एका वळणावरून रस्त्याच्या शेजारील नाल्यात कोसळली आणि तिघेही दुचाकीसह नाल्यामध्ये पडले. या ठिकाणी जास्त रहदारी नसल्याने अपघाताची माहिती लवकर कोणालाच मिळाली नाही. त्यामुळे तिघांनाही रात्रभरमदत मिळाली नाही. सकाळी या अपघाताबाबत माहिती उघडकीस आली.
Cricketer Death News । क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा! खेळताना ३ क्रिकेटपटूंचा मैदानातच मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जाईपर्यंत मोठा उशीर झाला होता. तोपर्यंत या अपघातात तीनही जणांचा मृत्यू झाला होता.
Aditya Thackeray । दुचाकीची धडक, अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे