मुंबई : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज 2 ऑगस्ट पाचवा दिवस आहे. आतापर्यंत 91 सुवर्णपदके निश्चित झाली आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी एक तृतीयांश म्हणजे एकूण 31 सुवर्ण जिंकले आहेत. सध्या हा देश एकूण 71 पदकांसह पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियासोबतच इंग्लंडनेही पन्नास पदके पूर्ण केली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी आतापर्यंत २१ सुवर्णांसह एकूण ५४ पदके जिंकली आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्णपदके, तीन रौप्य आणि 3 कांस्य पदके मिळवले आहेत. भारताने आतापर्यंत १७ वेळा कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेतला आहे. यामध्ये भारताला एकूण 503 पदके मिळाली आहेत.
विजेत्या खेळाडूंची यादी –
1 संकेत सरगर सिल्वर मेंस 55 किग्रा वेटलिफ्टिंग
2 गुरुराज पुजारी ब्रॉन्ज मेंस 61 किग्रा वेटलिफ्टिंग
3 मीराबाई चानू गोल्ड वूमेंस 49 किग्रा वेटलिफ्टिंग
4 बिंदियारानी देवी सिल्वर वूमेंस 55 किग्रा वेटलिफ्टिंग
5 जेरेमी लालरिनुंगा गोल्ड मेंस 67 किग्रा वेटलिफ्टिंग
6 अचिंता शेउली गोल्ड मेंस 73 किग्रा वेटलिफ्टिंग
7 सुशीला देवी सिल्वर वूमेंस 48 किग्रा जूडो
8 विजय कुमार यादव ब्रॉन्ज मेंस 60 क्रिग्रा जूडो
9 हरजिंदर कौर ब्रॉन्ज वूमेंस 71 किग्रा वेटलिफ्टिंग