Rakhi Sawant । बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राखी सावंत चांगलीच चर्चेत आली आहे. राखी सावंतचा एक्स म्हणजेच आदिल खान दुर्राणीमुळे (Adil Khan Durrani) तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदिलने मागच्या काही दिवसापूर्वी राखीवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्याने सांगितले होते की तिने खाजसगी गोष्टी प्रसारित केल्या आहेत. त्याचबरोबर राखीने त्याचे काही प्रायव्हेट व्हिडिओ माध्यमांमध्ये क्लिक केल्याचे आरोप अदिलने केले होते.
Devendra Fadnavis । मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांबाबत भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
याप्रकरणी अटक होऊ नये म्हणून राखी सावंतने मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाकडून तो जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे राखी सावंतला लवकरच अटक होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र न्यायालयाने अटकेचे अंतरिम संरक्षण वाढवले आहे. त्यामुळे राखीला तूर्त काही दिलासा मिळाला आहे. मात्र तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
Rohit Sharma । रोहित शर्माने मैदानामधेच आपल्या सहकाऱ्याला केली शिवीगाळ, पाहा video
राखी सावंतचा जामीन अर्ज फेटाळताना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत भोसले म्हणाले की, राखीने तिच्या पतीचे ज्या प्रकारे व्हिडिओ प्रसारित केले आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. राखी विरुद्ध यापूर्वी देखील असाच एक खटला प्रलंबित आहे. त्यामुळे तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये कोणालाही सूट देणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Accident News । मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात
आदिलने राखीवर केलेले गंभीर आरोप पाहता. न्यायालयाने देखील त्याच्या बाजूने निकाल दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राखीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारवाई टाळण्यासाठी राखी देखील तिच्या परीने सर्व प्रयत्न करत होती. या प्रकरणी तिला अटक होऊ नये असा अर्ज मुंबई न्यायालयात दाखल करण्यात आला होता मात्र हा अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे.