Latur Accident । सध्या लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूरमध्ये एका शेतकऱ्याला लिफ्ट घेणे चांगलंच जीवावर बेतलं आहे. एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने एकजण ठार तीन जखमी झाल्याची मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील लामजना पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
Sujay Vikhe Patil । नगरकरांसाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे. माहितीनुसार शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झालं आहे. निलंगा – औसा रोडवरील लामजना पाटी जवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latur Accident)
त्याचबरोबर तर अपघातात कारमधील दोन आणि दुचाकीवरील एक जण असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवकुमार कांबळे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील रहिवासी आहे.
Karnatka News । हॉटेलच्या खोलीत 6 जण घुसले, आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला; फरफटत रस्त्यावर आणलं अन्…