
Beed Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या मांजरसुंबा – पाटोदा महामार्गावर कंटेनर व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये ५ जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( Accident News)
अपघाताची माहिती तेथील स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि बचावकार्यास सुरवात केली. कंटेनर लोखंडी पाईप घेऊन चालला होता मात्र अपघात झाल्याने कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरले आणि मोठी वाहतुक खोळंबली होती. या नंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
OpenAI सीईओने बेस्टफ्रेंडसोबत केले लग्न, अनेक दिवसांपासून करत होते डेट; लवकरच मूलही होणार
या अपघातामधील जखमींना रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाला आहे. यामुळे महाजनवाडीसह वाघीरा गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
Ravindra Chandrashekhar | बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल