Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर टीका करू लागले. दरम्यान काल बारामती (Baramti) या ठिकाणी अजित पवार यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, बारामती शहर आणि तालुक्याचा विकास कोणी केला? यामधील अनेक जणांना मी मोठे केले.. त्यांना चांगली पदे दिली मानसन्मान दिला. या लोकांना कोणी ओळखत नव्हते मात्र त्यातील अनेक जणांनी माझ्या तरुणपणात माझ्यासोबत काम केले आहे. पण आता ते गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. मी कोणाला काय बोललो की बघा कसा बोलतो असे म्हणत आहेत. असे लोक ओवाळून टाकले पाहिजेत. असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना लगावला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामतीचा आमदार म्हणून मी जेवढी काम करतो तेवढे कोणीही करू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे. उगाच मी हुशारक्या मारत नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी दररोज सकाळी पाचला उठतोय. सकाळी सहाला काम करतोय. जेवण करायला देखील वेळ मिळत नाही अशी स्थिती आहे. आजची बारामती कोणी उभी केली हे सर्वांनाच माहित आहे. असं ते म्हणाले आहेत.
Rakhi Sawant । ब्रेकिंग! राखी सावंतचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक…नेमकं काय घडलं कोर्टात?
त्याचबरोबर, यावेळी अजित पवार यांनी मेडिकल कॉलेज संदर्भात देखील मोठी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य सुविधा देखील चांगल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उभे केले जाणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.
Nashik News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! भुजबळ कुटुंब मोठ्या अडचणीत?