
Manoj Jarange । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 26 जानेवारी पासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनादरम्यान आंतरवली सराटी ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहेत. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. मुंबई आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी या गावातून निघणार आहेत. सर्व मराठा बांधव येणारा असून त्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
आंदोलनाचा मार्ग कसा असणार?
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम- रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
25 जानेवारी सहावा वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी सातवा मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी
मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये ते दोन दिवस थांबणार असून पुण्यामध्ये मराठा समाज बांधवांचा आकडा एक करोड होणार आहे. त्याचबरोबर पुण्यावरून मुंबईमध्ये जाताना कोणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे असे आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.