मुंबई : महाराष्ट्रातील वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान विरोधकांनी महाराष्ट्रात मंजूर केलेला हा प्रकल्प गुजरातला ( Gujarat) का गेला? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना धारेवर धरलं.
दिलासादायक! लम्पीने संक्रमित गुरांच्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग करणार; वाचा सविस्तर
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प गुजरातला का गेला याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अस वक्तव्य केलं आहे ज्याने खळबळ उडवली आहे. त्यामुळे अशातच आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
क्लाईड क्रास्टो म्हणाले की, देवेंद्र फडणवीसजी सांगतात की येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे जाणार, पण ही घोषणा करण्यापूर्वी फडणवीस यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली का? आण जर दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढं नाही गेला नाही तर फडणवीसजी राजीनामा देणार का?, असा सवाल क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीसजी सांगतात “महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत गुजरातच्या पुढे”, ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली का?
— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) September 17, 2022
जर हे शक्य झाले नाही तर फडणवीसजी राजीनामा देणार का?
ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहे, तो पर्यंत हे शक्य होणार नाही.#BJP
पुढे क्लाईड क्रास्टो म्हणले की, ज्या गतीने सर्व व्यवसाय , प्रकल्प गुजरातला पाठवत आहे, तो पर्यंत गुजरातच्या पुढं महाराष्ट्र जाणार हे शक्य होणार नाही.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता; अनिल पहाडे यांचे प्रतिपादन
देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबविली?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2022
त्यातून निर्माण होणारे 5 लाख रोजगार कुणी थांबविले ?
महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा 10 वर्ष पुढे जाण्यापासून कुणी रोखले?
(लघू उद्योग भारती, महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन मुंबई दि. 16 सप्टेंबर 2022) pic.twitter.com/rbI8oeI7UO
दरम्यान देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबविली? त्यातून निर्माण होणारे 5 लाख रोजगार कुणी थांबविले ? महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा 10 वर्ष पुढे जाण्यापासून कुणी रोखले? अशे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.