Dhangar Reservation | राज्यात सध्या मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाचा विषय देखील चर्चेचा ठरत आहे. धनगर आरक्षणामुळे देखील राज्याचे वातावरण चांगलेच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर शिंदे समितीचा अहवाल मागवावा त्याचबरोबर 26 जानेवारीपर्यंत योग्य तो निर्णय घेऊन आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.
मागच्या काही दिवसापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने शिंदे समितीची नेमणूक केली होती. मात्र ही समितीची नेमणूक होऊन एक महिना झाला आहे. तरी देखील अजून शिंदे समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे राज्य सरकारने शिंदे समितीकडून लवकरात लवकर अहवाल मागून घ्यावा. यासाठी आज धनगर परिषद व अमरावती जिल्ह्यातील धनगर बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News | पुण्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश! अभिनेत्रीसह तीन महिला पोलिसांच्या ताब्यात
राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत अजून कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. शिंदे समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती? तो झाला की अजूनही अभ्यासाला सुरुवात झाली नाही? याबाबत सरकार सोयीस्कर मौन राखून गप्प आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी धनगर बांधवांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे 26 जानेवारी पर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा 26 जानेवारी नंतर विदर्भातील धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील धनगर बांधवांकडून सरकारला देण्यात आला आहे.
Viral News | लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने तरुणाने उचलले भयानक पाऊल, घटना वाचून बसेल धक्का