
Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये करणी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचे धाडस बदमाशांनी केले होते. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या वडिलांवर अपहरणकर्त्यांनी गोळ्या झाडल्या. जखमी वडिलांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
सर्व आरोपी हे गावातीलच असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात पोहोचून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 1 आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस तपासात गुंतले आहेत. बदायूं जिल्ह्यातील दातागंज कोतवाली येथील सादुल्लागंज गावात ही घटना घडली.
Sharad Pawar | राम मंदिराबाबत शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!
सदुल्लागंज गावचे रहिवासी सुधीर कुमार सिंह हे करणी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्याचा भाऊ राजीव यांनी सांगितले की, सोमवारी रात्री शेजारी राहणारे तीन जण त्यांच्या घरात घुसले होते. ते सुधीरच्या मुलीचे अपहरण करत होते. मुलीचा आवाज ऐकून सुधीर आणि त्याची पत्नी बाहेर आले, त्यांनी मुलीला घेऊन जाण्यापासून रोखले. यावेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.