Sushil Kumar Shinde । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी घडत आहेत. दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला त्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Crime News । मोठी बातमी! जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, मुलीला पळवून नेण्यासाठी आले होते
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचे वर्चस्व मानले जाते. सुशील कुमार शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांना भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. सुशील कुमार शिंदे खरच भाजपात प्रवेश करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
माहितीनुसार, सोलापुरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली. अक्कलकोट येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी दावा केला की, मला आणि त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्यासाठी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून मोठी ऑफर आली होती. यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली.
चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ते सुशील कुमार शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सोलापूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.