Mumbai Crime । इंजीनियर तरुणाचं धक्कादायक कृत्य! अभिनेत्रीचे न्यूड फोटो तिच्याच कुटुंबीयांना पाठवले

Mumbai News

Mumbai Crime । मॉर्फ्ड न्यूड फोटो आणि व्हिडिओचे प्रकार हे सर्रास घडतच आहेत. यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मागच्या काही महिन्यापूर्वी एका अभिनेत्रीचे मॉर्फ्ड फोटो तिच्याच नातेवाईकांना पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी 34 वर्षाच्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी त्याचे सतत लोकेशन बदलत होता मात्र पोलिसांनी सापळा रचत आरोपीला धाराशिव या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

Thackeray group । ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; बड्या अधिकाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॉम्प्युटर इंजिनिअर असून पुण्यातून तो एमबीए करत होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचे सोशल मीडिया अकाउंट आणि त्याच्या मोबाईल नंबर सातत्याने ट्रॅक करत होते. अखेर मंगळवारी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी धाराशिव मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी लगेच त्याच्या शोधासाठी धाराशिव गाठले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी मूळचा पुण्याचा रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

Rajan Salvi । ब्रेकिंग न्यूज! ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल

या आरोपीने मागच्या काही महिन्यापूर्वी एका अभिनेत्रीचे मॉर्फ्ड न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर ते फोटो जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही पाठवण्यात आले होते. त्यानंतर अभिनेत्रीने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

ASER Report 2024 । दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत सर्वेक्षणात धक्कादायक बातमी समोर!

Spread the love