![Kishori Pednekar](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/01/Kishori-Pednekar-1024x576.jpg)
Kishori Pednekar । मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये (Shivsena) मोठी फूट पडली. अजूनही पक्षातील कार्यकर्ते शिंदे गटात पक्षांतर करत आहेत. दरम्यान, पक्षात फूट पडूनही ठाकरे गटाला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
Manoj Jarange Patil । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील करणार राजकारणात एन्ट्री?
ईडीने कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी (Body bag scams) हे समन्स बजावले आहेत. किशोरी पेडणेकर यांना ईडीने येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती ताजी असताना आता किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स (Ed Summons to Kishori Pednekar) बजावले आहे.
Rohit Pawar । सर्वात मोठी बातमी, रोहित पवारांना ईडीचं समन्स
“ईडीची ही रोजची कारवाई झाली असून ईडीने आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी जाऊन तपास केला, ईडीला जे पंतप्रधान देशाच्या 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत बोलले होते ते दिसत नाही. ईडीचा वापर करुन विरोधकांचा नामहरण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
Nagpur News । मोठी बातमी! मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धडक कारवाई; तिघांना अटक