Sharad Pawar । भाजप (BJP) सोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून अजित पवार शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) वयावरून अजित पवार नेहमीच त्यांच्यावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना तरुणांना वयस्कर लोक संधी देत नाहीत असे म्हणत अजितदादांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोलाला लागलावला होता. आता यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले, “अजित पवार राजकारणात कुठून आले. त्यांना कोणी आणल पहिल्यांदा तिकीट कोणी दिल? अशी कित्येक उदाहरणे आहेत. यावर फारस लक्ष द्यायचं नसतं असं म्हणत पवारांनी दादांच्या टोमण्यांना हसून उत्तर दिलं. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Jodhpur Train Accident । पाळीव कुत्र्याने घेतला बहीण-भावाचा जीव, घडलं भयंकर; वाचून बसेल धक्का
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमांवर देखील टीका केली आहे. तरुणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे यासंदर्भात मोदींनी उल्लेख केला असता तर बरं झालं असतं. विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल चार चांगले बोलले असते तर बरं दिसलं असतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.