Rashmika Mandanna । प्रसिद्ध भारतीय सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी एफआयआर नोंदवला होता आणि तेव्हापासून आरोपीचा शोध सुरू होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केल्याचे वृत्त आहे. या लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला होता. मात्र, मुख्य आरोपी पोलिसांपासून फरार होता.
Mumbai News । धक्कादायक बातमी! बॉयफ्रेंडने गळा घोटत संपवलं गर्लफ्रेंडला
एएनआयच्या वृत्तानुसार, दोन महिन्यांच्या सखोल तपास आणि डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले आहेत. त्यासाठी पोलिसांच्या विशेष कक्षाने आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हा व्हिडीओ सर्वप्रथम कोठून तयार केला आणि तो कुठून अपलोड केला, याचा शोध घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
NCP MLA disqualification Case । राष्ट्रवादी आमदार प्रकरणात समोर आली सर्वात मोठी अपडेट!