Sharad Pawar । शरद पवारांनी सांगितला थरकाप उडवणारा किस्सा, म्हणाले; पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात बचावलो

Sharad Pawar

Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडल्यापासून शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार गटात सामील होत आहेत. असे असूनही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार डगमगले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी सोलापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नॅबचे संस्थापक माजी आमदार प्रकाश यलगुलवार (Prakash Yalgulwar) यांच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी काही प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील (India-Pakistan border) किस्से सांगितले. (Latest marathi news)

Sanjay Shirsat । संजय शिरसाट यांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा!

“माझ्या एका सियाचीनच्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत प्रकाश होते. आम्ही गेलो त्याठिकाणचा परिसर पाहिला, जवान ज्या प्रकारे रहातात, त्यांच्याशी संवाद केला आणि हे करून आम्ही परत निघालो तर तेव्हा पाकिस्तानकडून (Pakistan) गोळीबार सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या जवानांनी देखील गोळीबार सुरू केला आणि आम्हा लोकांची तिथून सुटका केली”, असा थरकाप उडवणारा किस्सा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

Crime News । ‘उपचारासाठी आई-वडिलांच्या घरून पैसे आण’… तिने नकार दिल्याने सासरच्यांनी गरोदर महिलेची केली हत्या

“खरंतर राजकारणामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. यातील काही लोक नेतृत्व करण्यासाठी असतात, नेते बनून समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतात. तर काही लोक मेहनत कष्ट करून २४ तास समाजासाठी वेळ देणारे, पदासंबंधी विचार न करणारे आणि जी विचारधारा आपण स्वीकारली त्या विचारधारेसंदर्भात प्रामाणिकपणाने कृती करणारे म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते प्रकाश यलगुलवार”, असं शरद पवार बोलताना म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis । नोकरी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य; 25 कोटी लोकांना मिळणार रोजगार

Spread the love