Amruta Fadnavis । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना गायनाची प्रचंड आवड आहे. त्यांच्या गाण्याला नेटकरी देखील प्रचंड प्रतिसाद देतात. यामुळे त्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Ajit Pawar । पुण्यात अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का!
अमृता फडणवीस यांचा लवकरच नवीन गाणं रिलीज होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक गाणं लिहिलं असून ते गाणं अमृता फडणवीस गाणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः अमृता फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये ‘वॉक फॉर नेशन’चं आयोजन करण्यात आल आहे. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. यामध्ये मी देखील गायल आहे. आज पहिल्यांदाच मी सांगत आहे हे गाणं लवकरच रिलीज होईल असं त्या म्हणाल्या आहेत.