Rohit Pawar । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी कडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयात असणार आहेत. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना कार्यालयापर्यंत सोडायला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या समर्थनात शक्ती प्रदर्शन करणार आहे. त्याचबरोबर ईडीला चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सकाळी अकरा वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत. मात्र ईडीच्या चौकशीला जाण्याआधी ते पक्ष कार्यालयात जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीकडून मोठ शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे.
ईडीला चौकशीसाठी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यादेखील सोबत येणार असल्याचे देखील रोहित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या चौकशीकडे लागले आहे.