
Devendra Fadnavis । मराठा समाजासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य (Maratha reservation) केल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते आणि ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. (Latest marathi news)
Gunratna Sadavarte । मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार
यावर आता उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सांगू इच्छितो की, कोणत्याही प्रकारे ओबीसींवर (OBC) अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळायला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केल्या असून ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे पुरावा नाहीत अशा लोकांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही,” असे फडणवीस म्हणाले आहेत.
“ज्या लोकांचा खऱ्या अर्थाने कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता अशा लोकांना सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळेल. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर छगन भुजबळ यांचं समाधान होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचा नाही, अशी पहिल्या दिवसापासून आमची ही भूमिका आहे. आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होऊ दिला नाही”, असं फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.