Shivsena Pratod । गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे राजकारणात भूकंप, शिवसेनेचे प्रतोद कोण? भरत गोगावले की कुडाळकर?

Shivsena Pratod

Shivsena Pratod । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) मोठी फूट पाडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजूनही ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. पण नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) व्हिडिओमुळे राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)

Vinod Patil । याचिकाकर्ते विनोद पाटलांनी केलं स्पष्ट, “कोणताच निर्णय झाला नाही, विनाकारण..”

आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle)यांना शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी गोगावले दिलेला व्हिप आता पक्षाच्या आमदारांना (Shivsena MLA) लागू असेल. अशातच आता शिवसेना(शिंदे गटाचा) प्रतोद बदलला आहे की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. यामागचं कारण आहे ते म्हणजे कुर्ला फेस्टीव्हलमध्ये लावलेले बॅनर आणि व्हिडीओ.

Student Drowned In Water । हृदयद्रावक! पोहण्याच्या नादात गेला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जीव

कुर्ला फेस्टीव्हलसाठी लावलेल्या बॅनर आणि व्हिडीओमध्ये शिवसेनेचे प्रतोद म्हणून आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर या फेस्टीव्हलमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाची माहिती देताना गौतमी देखील तिच्या शिवसेना प्रतोद, विभागप्रमुख, कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर असा उल्लेख करत आहे.

Manoj Jarange Patil । मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

Spread the love