Crime News । मुलगा आणि वडील यांचं नातं खूप भारी असतं, मुलाचे सर्व हट्ट हे वडील पुरवत असतात. त्यामुळे या दोघांमधील नातं काही वेगळंच असतं. मात्र सध्या सोलापूरमधून या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. सोलापुरमध्ये एका जन्मदात्या बापानेच विष पाजून आपल्या मुलाचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Solapur Crime News)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपला मुलगा शाळेत सतत खोड्या करतो, सारखा मोबाईल मागतो यामुळेच जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर या ठिकाणी घडली. या घटनेने सोलापूर शहर हादरून गेले आहे. वडिलांनी मुलाच्या कोल्ड्रिंकमध्ये विषारी पावडर टाकून त्याची हत्या केली. शाळेतून त्याच्या सतत तक्रारी येत होत्या, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणांवरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
Pune Crime । पुन्हा दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती! प्रेम प्रकरणातून प्रेयसीला झाडल्या गोळ्या
१५ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. मात्र १५ दिवसांनी अखेर आरोपीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. वडिलांनीच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार मुलाच्या वडिलांनविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
Solapur Accident । भीषण अपघात! भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू