Mexico Accident । भीषण रस्ता अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली, 18 जागीच ठार तर 29 जखमी

Accident

Mexico Accident । सध्या बस अपघाताची एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात होऊन दोन महिला आणि तीन लहान मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा भीषण अपघात मेक्सिकोच्या वायव्य सिनालोआ राज्यात मंगळवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास झाला आहे.

Jarange Patil । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण; जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा

हा बस अपघात मेक्सिकोच्या शेजारील राज्य पुएब्लाच्या सीमेजवळ असलेल्या टेपेलामेम शहरात घडला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बस अपघातात एकूण 29 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय इमिग्रेशन एजन्सीने सांगितले की, बसमध्ये 55 परदेशी नागरिक होते.

Ashok Saraf | अशोक सराफ यांच्याबाबत मोठी आणि महत्वाची माहिती समोर!

या अपघातामुळे महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

Budget Session । मोठी बातमी! अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच मोदी सरकार घेणार सर्वात मोठा निर्णय

समोरून भरधाव वेगात एक ट्रक आला आणि ट्रकने बसला जोरदार धडक दिली. आणि हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Rishabh Pant । भीषण अपघातावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया; म्हणाला, “मला वाटले की या जगात माझा वेळ संपला…”

Spread the love