
मुंबई : दसरा मेळावा(Dasara melava) शिवसेनेचा की शिंदे गटाचा (Shinde group) यावरून राजकीय वातावरण चांगलच तापल्याच पहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना (shivsena)आमने-सामने आले आहेत. दरवेळी दसरा मेळावा शिवसेना शिवाजी पार्कवर (shivaji park)करत असते. परंतु यावेळी शिंदे गटाने देखील दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही.
Onion: दिवाळीपर्यंत कांदा दरवाढीची शक्यता, महाराष्ट्राच्या कांद्याच्या मागणीला परराज्यातून वाढ
शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार की नाही होणार? झाल्यास कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान या वादावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
Maize Crop: मक्याचे दर टिकून राहतील? पाहुयात नेमकी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
शरद पवार म्हणाले की,” एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे.पण त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे.मात्र दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
Sanjay Raut: मोठी बातमी! राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी