Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून समृद्धी महामार्ग सतत चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र या महामार्गावर दररोज अपघात घडत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. काही केल्या या ठिकाणचे अपघात सत्र कमी होत नाही. समृद्धी महामार्गावरील अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना करून देखील या ठिकाणचे अपघाती थांबत नाहीत. सध्या देखील या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर हे अपघात चालकाचे नियंत्रण सुटून, त्याचबरोबर वन्यप्राणी आडवे येऊन, गाडीचे टायर फुटून अपघात घडत आहेत. सध्या देखील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली आणि भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Budget 2024 । अर्थसंकल्पात महिलांसाठी धडाकेबाज निर्णय, वाचा महत्वाच्या घोषणा
या अपघातातील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. अपघातग्रस्त बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात होती. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील डोनद लोकेशन १७३ जवळ बस आली असता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला आहे.
Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केली सर्वात मोठी घोषणा!