Rohit Pawar । अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने मंगळवारी (६ फेब्रुवारी) सांगितले. तसेच, आयोगाने शरद पवार यांना ७ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. हे लक्षात घेऊन शरद पवार गटाला निवडणूक आचारसंहिता नियम 1961 च्या नियम 39AA चे पालन करण्यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर या निकालावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(ECI recognises Ajit faction as NCP)
रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते….आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, 6 महिने चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. बहुसंख्य आमदारांनी अजित गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी मदत केल्याचे आयोगाने म्हटले आहे. अजित पवार 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. आघाडी सरकारमध्ये अजित यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. आणि त्यांना पक्षावर आणि चिन्हावर हक्क मिळाल्यामुळे अजित पवार गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Rahul Narvekar । राष्ट्रवादीचा निकाल केव्हा लागणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं..