Maratha Reservation । मागच्या काही दिवसापासून राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील (Jarange Patil) मुंबईच्या वेशीवर दाखल झाल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणासंबंधी सर्व मागण्या मान्य केल्या. मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अजून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे.
baba siddique | महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्व अटी मान्य करत अधिसूचना काढत आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं. आता मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar । प्रसिद्ध अभिनेत्रीने केली थेट अजित पवारांवर टीका; म्हणाली, “बेईमानी ओळखते…”
१५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार असून या अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
Mahendra More । बिग ब्रेकिंग! भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार