
Abhishek Ghosalkar । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वतःला गोळ्या झाडल्या होत्या. त्याने स्वतःवर चार गोळ्या झाडून घेतल्या होत्या. त्यामुळे यामध्ये त्याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Accident News । भयानक अपघात! परीक्षेला जाताना तिन बहिण-भावावर काळाचा घाला; डंपरने चिरडलं
आपापसातील वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मॉरिस भाई याने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत आधी फेसबुक लाईव्ह केले आणि त्यानंतर गोळ्या फायर केल्या यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे तर आरोपी मॉरिस भाईने स्वतःवर देखील गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे.
Pune News | पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय! आता पुण्यातील गुंडाना…