Nikhil Wagle । पत्रकार निखिल वागळे यांना पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने भाषण देण्यासाठी बोलावण्यात आले होते. निखिल वागळे पुण्यातील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांनी आधी निखिल वागळे यांच्या गाडीवर शाई फेकली आणि नंतर त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली या घटनेननंतर निखिल वागळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Nikhil Wagle । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडली
याबाबत बोलताना निखिल वागळे म्हणाले, “याआधी देखील माझ्यावर खूप हल्ले झाले आहेत. माझ्यावर जवळपास आत्तापर्यंत सहा हल्ले झाले. सातव्या हल्ल्यातूनही वाचलो. आज हल्ला झाला तेव्हा मी काय बोललो, मरण डोळ्यासमोर होतं. ड्रायव्हर वैभवमुळे आम्ही वाचलो. त्यांनी भाजपवाल्यांपासून वाचवलं. जोपर्यंत निखिल वागळे जिवंत आहे, तोपर्यंत फॅसिसमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार”. असं निखिल वागळे म्हणाले आहेत.
पीएम मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली
निखिल वागळे हे एका विशिष्ट मताचे पत्रकार म्हणून ओळखले जातात आणि अनेक राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. वागळे यांनी मोदींविरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदी समर्थक वागळे यांच्यावर नाराज होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने निखिल वागळे सुखरूप बाहेर आले मात्र त्याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.