Congress । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेसचे ‘हे’ आमदार भाजपच्या गळाला

Congress

Congress । सध्या काँग्रेसला चांगलीच गळती लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक असे अनेक बडे नेते काँग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. सध्या देखील नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ashok Chavan । भाजपच्या मंचावर अशोक चव्हाणांची जीभ घसरली; म्हणाले, “मुंबई काँग्रेस…”

काँग्रेसचे अजून दोन आमदार भाजपच्या गळाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात काँग्रेसचे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे हे देखील काँग्रेसचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशी माहिती एका मराठी वृत्तवाहिनीला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Narayan Rane । नारायण राणे यांच्या संदर्भात समोर आली सर्वात मोठी बातमी!

देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र पत्रकारांशी बोलताना त्यांनी लवकरच नक्की सांगतो असं म्हटल आहे. त्यामुळे आता अंतापूरकर हे काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Mallika Rajput Death । ब्रेकिंग! मनोरंजन विश्वात मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

Spread the love