Supriya Sule । गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या (Sharad Pawar group) नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारच्या अटकळांचे खंडन केले आहे.
Eknath Shinde । पुण्यात एकनाथ शिंदे यांना बसणार मोठा धक्का? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे, कोणी काय करत असेल त्याला मी जबाबदार नाही.” सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवरून सांगितले की, ही बातमी जो कोणी चालवत आहे ते चुकीचे करत आहे.
Sharad Pawar group । मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
राज्यसभा निवडणुकीनंतर विलीनीकरणाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गटाचे विलीनीकरण राज्यसभा निवडणुकीनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार यांनी संपूर्ण पक्षाला वेठीस धरले आहे. त्यांना निवडणूक चिन्हही मिळाले आहे. अशा स्थितीत शरद पवार रिकाम्या हाताने गेले आहेत. यानंतर शरद गटाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Ganpat Gaikwad । गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी