Rajya Sabha Election | महाराष्ट्रातील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक, राज्यसभा उमेदवारांबाबत मोठी बातमी

Rajya Sabha Election

Rajya Sabha Election | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडत आहे. सध्या महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आज काँग्रेसनेही पक्षाचा उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनाही आपापल्या तयारीत व्यस्त आहेत.

Amol Kolhe । शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांणवर अमोल कोल्हे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

महत्वाची बैठक झाली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. राज्यसभेसाठी उमेदवारी कोण भरणार हे वेळ आल्यावर कळेल. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार कुठून लढवणार आणि कोणत्या पक्षाला कोणती जागा देणार यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

Supriya Sule । शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? याबाबत सुप्रिया सुळेंनी केले मोठे वक्तव्य

या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली असून राज्यसभेसाठी महायुतीचे पाच उमेदवार निवडून येणार आहेत. या पाच पैकी तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार असणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीचा फायदा घेण्यासाठी सहावी जागा लढवावी का? यावर देखील या बैठकीत चर्चा झाली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.

Eknath Shinde । पुण्यात एकनाथ शिंदे यांना बसणार मोठा धक्का? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

Spread the love