Rajya Sabha Election | सध्या एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी त्याचबरोबर अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत. अखेर त्यांना पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारच बक्षीस मिळाले आहे. भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे देखील स्पष्ट होत आहे.
कदाचित नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप उतरवण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भाजप नेते पंकजा मुंडे आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या नावाची देखील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चर्चा होती. मात्र त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही.