Rajya sabha election 2024 । महाराष्ट्रात भाजपने (BJP) राज्यसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच पक्षाने मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेचे उमेदवार केले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना राज्यसभेचे उमेदवार बनवल्याबद्दल आभार मानले आहेत.
Rajya Sabha Election | भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी
दुसरीकडे भाजपने माजी महिला आमदाराला देखील थेट राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या मेधा कुलकर्णी या महिला आमदाराला थेट राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी मेधा कुलकर्णी यांनी म्हटले होते की, भाजपला त्यांच्या निष्ठेची किंमत दिसत नाही. मात्र आता त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेचं फळ मिळाले असल्याचे देखील बोलले जात आहे.
कोण आहे मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या म्हणून काम पाहिले आहे. 2014 च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्या विरोधात विजयी झाले. विशेष म्हणजे, पुण्यातून महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महिला सदस्यांपैकी त्या एक आहेत.