
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. यावरून राजकीय नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा प्रकल्प पुन्हा राज्यात येण्यासाठी अनेक प्रयत्न करण्याचे देखील दावे केले जात आहेत. आता यामध्येच त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलंय . त्याचबरोबर राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) इशाराही दिलाय.
रोहित पवारांनी याबाबत काही ट्विट केले आहेत. रोहित पवारांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांची भरती कोरोनासह इतर कारणांनी तीन वर्षांपासून रखडली असताना आता या भरतीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकालाही ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलंय’
जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांची भरती कोरोनासह इतर कारणांनी तीन वर्षांपासून रखडली असताना आता या भरतीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकालाही ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2022
त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलंय.
नंतर पुढे ते दुसरे ट्विट करत म्हणाले, ‘याशिवाय आरोग्य, टेक्निकल व इतर विभागाच्या भरतीचीही अशीच अवस्था आहे. राज्यात येऊ घातलेले वेदान्त-फॉक्सकॉनसारखे उद्योग इतर राज्यात जात असल्याने तिथं उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधीला राज्यातील युवकांना मुकावं लागतंय’.
Raju Srivastav Death: मोठी बातमी! कॉमेडीयन राजू श्रीवास्तवचे निधन
याशिवाय आरोग्य, टेक्निकल व इतर विभागाच्या भरतीचीही अशीच अवस्था आहे. राज्यात येऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन सारखे उद्योग इतर राज्यात जात असल्याने तिथं उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधीला राज्यातील युवकांना मुकावं लागतंय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2022
‘तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात वर्षभरात १३ हजार युवकांनी आत्महत्या केल्या. रोज ३५ युवक आपली जीवनयात्रा संपवतात. यावर गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. सरकार कोणतंही असो, युवकांच्या प्रश्नांना बगल दिली जाते, ही वस्तुस्थिती असून एक युवक म्हणून या गोष्टीचा खेद वाटतो’, अस देखील रोहित पवारानी ट्विटमध्ये नमूद केलय.
Gautami Patil: लावणीच्या नावावर गौतमी पाटीलने केले अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल, टीकांचा पडला पाऊस
शासकीय नोकर भरतीलाही मुहूर्त मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग निराशेच्या गर्तेत ढकलला जातोय. त्यामुळं तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी सरकारने ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, ही विनंती!@mieknathshinde@Dev_Fadnavis
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2022
त्याचबरोबर त्यांनी ट्विटमधून राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे. रोहित पवार म्हणाले, ‘शासकीय नोकर भरतीलाही मुहूर्त मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग निराशेच्या गर्तेत ढकलला जातोय. त्यामुळे तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी सरकारने ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, ही विनंती’.