Uddhav Thackeray । सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. बबनराव घोलप लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये जाणार? चर्चांना उधाण
मागच्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाने घोलप यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून घोलप हे नाराज होते. त्यानंतर आता घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहेत बबनराव घोलप?
बबनराव घोलप हे नाशिकच्या देवळाली मतदारसंघांमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना फुटल्यानंतरही त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून आपल्या लेकीला उमेदवारी मिळावी अशी इच्छा बबनराव घोलप यांना होती. मात्र ऐनवेळी ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने घोलप नाराज झाले होते. आणि या नाराजीमुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
Abhishek Ghosalkar Case । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक CCTV फुटेज समोर