Manoj Jarange Health । आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. अन्नपाणी घेण्यास नकार दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे.
अनेक विनंती करून देखील मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी पाणी घेण्यास नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. त्यामुळे त्यांची अवस्था पाहून त्यांचे सहकारी काळजीत पडले आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावत चालली आहे. आज त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. पोटामध्ये तीव्र वेदना होत असूनही मनोज जरांगे उपचार घेण्यास सतत नकारच देत आहेत.
आमरण उपोषणचा आजचा सहावा दिवस जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्या पोटात मोठ्या वेदना होत आहेत. जरांगेंनी उपचार घ्यावेत यासाठी सर्वजण त्यांना विनंती करत आहेत. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपचार घेणार नाही यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.