Pune Crime । पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढत चालले आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते मात्र याच विद्येच्या माहेर घरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आली आहे. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देखील पुण्यातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी तिला डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्याचबरोबर तिच्याकडून वेश्या व्यवसाय देखील करून घेतला आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, संबंधित पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या अवघ्या तीस हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य केले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमध्ये पीडितेचा काय दोष होता? तिच्यासोबत इतक निर्घृण कृत्य करणाऱ्या आरोपींना थोडी सुद्धा दया आली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांनी अजित पवरांचा ‘तो’ व्हिडीओ केला सोशल मीडियावर व्हायरल
१७ वर्ष अल्पवयीन मुलीला पंधरा दिवस डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने पैसे घेतले होते मात्र ते पैसे न दिल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. एवढेच नाही तर पीडीतेला पंधरा दिवस लॉज मध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय देखील करून घेतला आहे.
Manoj Jarange Health । चिंताजनक बातमी! मनोज जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना, प्रकृती आणखी खालावली