Uddhav Thackeray । सध्या आगामी निवडणुकांचे (Upcoming elections) वारे वाहत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र तरी देखील ठाकरे गटाला लागलेली गळती निवडणुकीच्या तोंडावर ही कायम आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंड केल्यानंतर आता स्थानिक नेतेही पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. सध्या देखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Mahesh Gaikwad । गोळीबारात गंभीर झालेल्या महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
हिंगोली लोकसभेचे संघटक व शिवसेनेचे नेते डॉ. बी. डी चव्हाण (Dr. B. D Chavan) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बंजारा समाजाचे नेते म्हणून बि.डी.चव्हाण यांची ओळख आहे. त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडणार आहे.
Maratha Reservation । ब्रेकिंग न्युज! मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी
त्यामुळे आता हिंगोली मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अकोल्यामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बि.डी. चव्हाण यांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात वंचितला मोठा बळ मिळणार आहे.