Chhagan Bhujbal । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून चांगलाच वाद होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज हा अहवाल देण्यात आला आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यानंतर ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडणारे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याबाबत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी थेट मनोज जरांगें यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. मात्र मनोज जरांगे यांना आयोग, मसुदा नेमका किती कळतो? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय!
त्याचबरोबर पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद मी आज पाहिली नाही. मात्र त्याबाबत माहिती घेतली आहे. पहिल्यापासूनच आम्ही सांगत आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आजही आमची तीच मागणी आहे. आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका हे आमचं म्हणणं आहे. असे देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.