Ajit Pawar ncp | देशातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. त्याअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील हायप्रोफाईल जागा मानला जातो. बारामतीतील लढत पवार कुटुंबीयांमध्येच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान आता बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
बारामतीमध्ये अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले. बारामतीत उमेदवार कोण असणार? हे त्यांनी स्पष्ट केले. आपला उमेदवार नवीन असणार आहे. पहिल्यांदा खासदार होणार असणार आहे. असं बोलत अजित पवार यांनी प्रथमच खासदारकीला उभा राहणारा उमेदवार नवीन असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण आले आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. तसेच शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला ही जागा मिळणार आहे. अजित पवार गटाकडून उमेदवार कोण? याची पुष्टी झालेली दिसते. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.